पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुझ्या प्रेमाची लागली हळद, पराग कान्हेरे अडकला लग्नबंधनात

पराग- मुक्ता

प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ आणि बिग बॉस फेम पराग कान्हेरे विवाहबंधनात अडकला आहे.  पराग गेल्या काही दिवसांपासून मुक्ता भातखंडेला डेट करत आहे. परागनं हळदी समारंभाचा फोटो शेअर करुन लग्नाची खुशखबर चाहत्यांना दिली आहे. तुझ्या प्रेमाची हळद लागली असं लिहित परागनं हा फोटो शेअर केला आहे. 

Video : आवय देयो Carona-फिरोना, बिग बींची करोनावर कविता

बिग बॉस मराठी २ मध्ये असताना परागचं नाव अभिनेत्री रुपाली भोसलेशी जोडलं गेलं.  मात्र बिग बॉस शो संपला आणि या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला.  पराग सेलिब्रिटी शेफ म्हणून प्रसिद्ध आहे. बिग बॉसमध्ये परागचं नवं रुप पाहायला मिळालं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Lag gayi tere pyaar ki haldi @muktabhatkhande

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

बिग बॉस २ च्या विजेतेपदाचा दावेदारही तो मानला  जायचा मात्र या स्पर्धेदरम्यान सह स्पर्धकासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याला बिग बॉसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 

कोरोनामुळे १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय