पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बिग बॉस'च्या घरात परतण्याबाबत शेफ परागचा खुलासा

पराग कान्हेरे

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेले दोन सदस्य घरात परत आले आहेत, मात्र तिसरा सदस्य शेफ पराग घरात परतेन का?, याची  प्रतीक्षा त्याच्या चाहत्यांना होती. काही दिवसांपूर्वी परागनं घरात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानं  इन्स्टाग्रामवर कोड्यात टाकणारी पोस्टही लिहिली होती, तेव्हापासून तो घरात परतणार अशा चर्चा होत्या. शिवानी सुर्वे घरात परतली, खंडणीच्या आरोपाखाली काही दिवसांपूर्वी ज्या अभिजित बिचुकलेंना घरातून अटक झाली ते देखील घरात परतले. पण परागचं काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना होताच. 

'जबरिया जोडी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली

अखेर परागनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे घरात परतण्याबाबत स्वत: खुलासा केला आहे. मी बिग बॉसमध्ये तुम्हाला परत दिसणार नाही  त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं परागनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे परागनं आणखी एक कोड्यात पाडणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामुळे पराग नवा शो  घेऊन येत आहे, अशाही चर्चा आहेत.

...अन सलमान खानने दिला कपिल शर्माला 'हा' सल्ला

शेफ पराग कान्हेरे याला घरातील सर्वात महत्त्वाचा नियम मोडल्यामुळे बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आलं. परागनं एका टास्कदरम्यानं राग अनावर झाल्यानं  घरातील सदस्य नेहा शितोळेच्या कानशीलात लगावली होती. त्याचं खेळातून  त्वरित निलंबनही करण्यात आलं होतं. त्यानंतर परागला घरातील सदस्याचं मन वळवण्याकरता एक संधीही देण्यात आली होती. मात्र घरच्यांनी त्याला मफी देण्यास नकार दिला होता. जर विणा जगतापवर लाथ उचलणारी आणि बिग बॉसला कायद्याची धमकी देणारी शिवानी घरात येऊ शकते तर मी का नाही?,  असा सवाल त्यानं टाइम्स ऑफ इंडियाला  दिलेल्या मुलाखतीत केला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#bbmarathi #bbm2 #endemolshine #colorsmarathi #maheshmanjrekar #biggbossmarathi2

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

परागची इन्स्टाग्राम पोस्ट आणि त्यानं व्यक्त केलेली इच्छा यावरून तो घरात परतणार अशा चर्चा होत्या, मात्र आता त्यानं या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.