पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पानिपत : संजय अहमद शाह अब्दाली तर क्रिती पार्वतीबाईंच्या भूमिकेत

पानिपत

आशुतोष गोवारिकर यांच्या बहुचर्चित 'पानिपत' चित्रपटातील दोन व्यक्तिरेखांवरून पडदा उठला आहे. या चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारत आहे तर क्रिती सॅनॉन  पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे. 

ईदला अक्षय- सलमानची टक्कर अटळच

पानिपतच्या युद्धात अहमद शाह अब्दालीला मराठ्यानं जिद्दीनं टक्कर दिली. मात्र या युद्धात मराठ्यांचा पराभव आणि सैन्याची अपरिमित हानी झाली. या युद्धावरच आधारित चित्रपट काढण्याचं शिवधनुष्य आशुतोष यांनी पेललं आहे. या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सॅनॉन, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहल, झिनत आमन यांसारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 

६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पार्वतीबाईंच्या भूमिकेत असलेल्या क्रितीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मी यापूर्वी अशी भूमिका कधीही साकारली नव्हती. मी पंजाबी आहे, एक मराठी व्यक्तीरेखा साकारण्यासाठी माझी निवड कशी झाली याचं मला आश्चर्य वाटत आहे. मात्र मला ही  संधी गमवायची नव्हती. पार्वतीबाईंची भूमिका साकारणं माझ्यासाठी मोठं आव्हान  होतं, असंही क्रिती म्हणाली.

बेघरांसाठी प्रार्थना करा, दिल्ली प्रदूषणाविषयी प्रियांकाची चिंता

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Panipat posters Kriti Sanon turns Parvati Bai Sanjay Dutt transforms into invader Ahmad Shah Abdali