पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पानिपत' चित्रपट राज्यातील चित्रपटगृहात करमुक्त

पानिपत

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपट  राज्यात टॅक्स फ्री करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. आशुतोष गोवारिकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोशल मीडियावर आभार मानले आहेत. ३० एप्रिल २०२० पर्यंत राज्याच्या सर्व चित्रपटगृहात हा  चित्रपट करमुक्त असणार आहे.

दीपिकाच्या छपाक सिनेमाची तिकीटे रद्द केल्याचे ते स्क्रिनशॉट किती खरे?

पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर हा चित्रपट आधारलेला आहे. ६ डिसेंबर २०१९मध्ये  हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता. अर्जुन कपूर, क्रिती सॅनॉन आणि संजय दत्तबरोबरच अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका  या चित्रपटात आहेत. मराठ्यांच्या साम्राज्यावरील एक भळभळती  जखम  म्हणून या युद्धाचा उल्लेख नेहमीच केला जातो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मराठे सैन्य लढले, मराठ्यांची या युद्धात हार झाली असली तरी  या युद्धातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

हा चित्रपट महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकांनी पहावा, मराठ्यांच्या सम्राज्याचा इतिहास जाणून घ्यावा यासाठी राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात येणार आहे. 

मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अक्षय कुमारविरोधात तक्रार