पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्स ऑफिसवर 'पानिपत'च्या कमाईचं गणित बिघडलं

पानिपत

'पातिपत' चित्रपटाच्या कमाईचे गणित पुरते गडबडले आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'पती, पत्नी और वो'नं चांगली कमाई केली मात्र मुंबई वगळता इतर ठिकाणी प्रेक्षकांकडून 'पातिपत'ला अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. 

हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' वर हॉलिवूडमध्ये चित्रपट?

'पातिपत'च्या तिसऱ्या युद्धावर आधारलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांनी केलं आहे. अर्जुन कपूर, क्रिती सॅनॉन, संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं दोन आठवड्यात २९.११ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट परदेशातही प्रदर्शित झाला. या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यात एकूण ८.०८ कोटींची कमाई केली. 

'जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल'ची पहिल्याच आठवड्यात बक्कळ कमाई

राजस्थानसारख्या राज्यातून या चित्रपटाला तीव्र विरोध झालेला पहायला मिळाला. या चित्रपटात जाट राज सुरजमला यांचं चुकीचं चित्रीण केल्याचा आरोप जाट समुदायाचा होता. त्यांनंतर या चित्रपटातील ११ मिनिटांच्या दृश्याला कात्रीही लावण्यात आली होती. 

माझी मदत न घेता करिअर घडवत आहेत, आमीरला वाटतोय मुलांचा अभिमान