पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पानिपत'मधील त्या वादग्रस्त दृश्याला अखेर कात्री?

पानिपत

'पानिपत' चित्रपटाविरोधात राजस्थानमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या चित्रपटात महाराजा सुरजमल यांच्याबाबत चुकीचा संदर्भ दाखवल्याचा आक्षेप इथल्या स्थानिक नेत्यांसह जाट समुदायानं घेतला आहे. त्याविरोधात गेल्याच आठवड्यात निदर्शनंही झाली. अखेर  चित्रपटातील त्या वादग्रस्त दृश्यांना निर्मात्यांनी कात्री लावली असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं प्रकाशित केलं आहे. 

जंगजौहर : बांदल सेना आणि बाजीप्रभूंच्या अमर बलिदानाची गाथा

जाट समुदाय पानिपतमधील एका दृश्यामुळे नाराज आहे, या चित्रपटावर बंदी घालण्याची  त्यांची मागणी आहे. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे त्यामुळे त्यांच्या भावना लक्षात घेता निर्मात्यांनी चित्रपटातील त्या ११ मिनिटांच्या वादग्रस्त दृश्यावर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ते दृश्य चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही, असं वृत्त संबधीत वृत्तपत्रानं सुत्रांच्या हवाल्यानं प्रकाशित केलं आहे. 

सारा, अभिनंदन वर्धमान पाकमध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीय व्यक्ती

 भाजपचे आमदार विश्वेंद्र सिंग, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 'पानिपत'वर बंदी घालण्याची मागणी केली होती. एक महान जाट राजा सुरजमल यांचं चित्रपटात केलेलं चित्रण अत्यंत बेजबाबदार आहेच पण त्याचबरोबर ऐतिहासिक पुराव्यांचीही  पायमल्ली केलेली आहे, असं आमदार विश्वेंद्र सिंग यांनी म्हटलं होतं तर सुरजमल यांचं  या चित्रपटात केलेलं चित्रण अतिशय निंदनीय असल्याचंही वसुंधरा राजे म्हणाल्या होत्या. 

Happy Birthday Bharat Jadhav : विनोदाची उत्तम जाण अन् टायमिंगवर कमालीची हुकूमत

पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर  हा चित्रपट आधारलेला आहे. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन कपूर सदाशिवराव भाऊ, क्रिती सॅनॉन पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे. ६ डिसेंबररोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.