पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या 'पानिपत'ची एकूण कमाई

पानिपत

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. अर्जुन कपूर, क्रिती सनॉनची प्रमुख भूमिका असलेला  हा चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारलेला आहे. या चित्रपटाला कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, अनन्या पांड्येच्या 'पती पत्नी और वो'नं टक्कर दिली आहे.

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मधून ही अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शच्या माहितीनुसार  'पानिपत'नं एकूण २२. ४८ कोटींची कमाई केली आहे.  पहिल्या दिवशी ४.१२, दुसऱ्या दिवशी ५.७८ आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटानं ७.७८ कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला.  सोमवारी चित्रपटानं २.५९  कोटी आणि मंगळवारी २.२१ कोटींची कमाई केली. 

महाराष्ट्रातल्या या ठिकाणी होणार 'पावनखिंड'चं चित्रीकरण

तर तीन दिवसांत आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं एकूण ५. ९७ कोटींची कमाई केली आहे. याआउलट 'पती पत्नी और वो'नं बॉक्स ऑफिसवर ४६.९९ कोटींची कमाई केली. 

सख्ख्या नात्याहून अधिक घट्ट आहे लतादीदी- दिलीप कुमारांचं नातं