पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिती म्हणते, पती, पत्नी आणि वोसोबत पनिपत पाहा

पानिपत आणि पती पत्नी और वोमध्ये टक्कर

या आठवड्यात शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 'पती, पत्नी और वो' आणि 'पानिपत' या दोन चित्रपटांची टक्कर पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यानं कमाईच्या बाबतीच कोणता चित्रपट वरचढ ठरेल याची उत्सुकता आहे.  'पानिपत' हा चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारलेला  आहे यात अर्जुन कपूर, क्रिती सॅनॉनसह अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

सलमान खान विरोधातील ते सर्व खटले सुप्रीम कोर्टाकडून रद्द

तर 'पती पत्नी और वो' मध्ये कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर, अनन्या पांड्ये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे दोन्ही चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. बॉक्स ऑफिसवरील या दोन्ही चित्रपटांच्या टक्करेबद्दल अर्जुन आणि क्रितीला विचारण्यात आलं. 

आमिरचा 'दंगल' ठरला या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट - Yahoo India

तेव्हा पानिपत आणि पती, पत्नी और वो दोन्ही चित्रपट पाहा असं अर्जुन म्हणाला, मात्र  क्रितीनं दिलेल्या उत्तरानं सर्वांचंच लक्ष वेधलं. पती, पत्नी आणि वोसोबत पनिपत पाहा, असं भन्नाट उत्तर क्रितीनं दिलं.