पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७०: आतिफ असलमची सोशल मीडियावर भारतीयांनी घेतली शाळा

पाकिस्तानी गायक अतिफ असलम

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने त्याचा निषेध केला. त्यानंतर आता पाकिस्तानी गायक आतिफ असलम याने देखील या निर्णयाचा निषेध केला. दरम्यान, सोशल मीडियावर तो ट्रोल झाला असून भारतियांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हा अत्यवस्थ

'तुम्हा सगळ्यांना सांगायला आनंद होत आहे की, मी लवकरच जीवनातला सर्वात महत्वाचा प्रवास करणार आहे. मी हज यात्रेसाठी रवाना होत आहे. त्यापूर्वी मी माझे सर्व चाहते, कुटुंबिय आणि मित्रांची माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची माफी मागतो. देवाकडे प्रार्थना करताना माझी आठवण काढा, असे ट्विटमध्ये आतिफने म्हटले आहे.

'बॉडी शेमिंग'वर अभिनेत्री नित्या मेननने मांडले परखड मत

यासोबत आतिफने आणखी एक ट्विट केले आहे त्यामध्ये त्याने असे म्हटले आहे की, 'काश्मीरवर होणाऱ्या हिंसाचार आणि अत्याचाराचा मी तीव्र निषेध करतो. देवा काश्मीरमधील आणि जगभरातील सर्व निरपराध लोकांच्या जीवनावर दया करा.' आतिफच्या या ट्विटनंतर तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे.

इंडियन आयडॉलच्या 'या' स्पर्धकासोबत जोडले नेहा कक्करचे नाव

सोशल मीडियावर एका भारतीय यूजरने त्याला भारताच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करु नको असे सांगितले. 'तू हजला जात आहे तर हजलाच जा. काश्मीरच्या लोकांना काही शिक्षा नाही मिळाली. त्यांच्यावर कोणी अन्याय नाही करत आहे. काश्मीर भारताचा हिस्सा आहे आणि राहणार. तू तुझा देश बघ. दुसऱ्या देशांमध्ये लक्ष घालू नकोस.

तर, दुसऱ्या आणखी एका यूजरने असे लिहिले आहे की, 'कोणत्या प्रकारचा अत्याचार होत आहे? तू आम्हाला सागू शकतो? तुला काश्मीरच्या लोकांची चिंता करण्याची गरज नाही. ते आता सुरक्षित हातामध्ये आहेत. तू केलेले ट्विट वाचल्यानंतर माझ्यासारख्या अनेक भारतीय चाहत्यांना तू गमावले.'

VIDEO: 25 वर्षानंतर माधुरी-सलमानचा ‘पहला-पहला प्यार है’ गाण्यावर डान्स