पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानी अभिनेत्रीनं घेतली ऋषी कपूर यांची भेट

ऋषी कपूर

गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळ अमेरिकेत कॅन्सरवर उपाचार घेत असलेल्या ऋषी कपूर यांची पाकिस्तानी अभिनेत्रीनंही भेट घेतली आहे.  काही महिन्यांपूर्वी ऋषी यांची तब्येत खूपच खालावली होती. ते अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत होते. यादरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांनी अमेरिकेत जाऊन ऋषी यांची भेट घेतली. 

करिना- आमिर येणार एकत्र?

पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हौसेन हिनं देखील ऋषी यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मावरा  ही पाकिस्तानमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं 'सनम तेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिनं आपल्या मैत्रीणीसोबत ऋषी यांची भेट घेतली. यापूर्वी  दीपिका पादुकोन, प्रियांका चोप्रा, शाहरूख खान, विकी कौशल, करण जोहर यांसारख्या कलाकारांनी ऋषी यांची भेट घेतली होती. 

दीपिकानं घेतली नितू- ऋषी कपूर यांची भेट

ऋषी यांची तब्येत सुधारत असून ते ऑगस्ट महिन्यात भारतात परतणार असल्याचं समजत आहे. ऋषी यांनी स्वत: एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माझ्या प्रकृतीत सुधारणा होत असून माझा कॅन्सर आता पूर्णपणे बरा झाला आहे त्यामुळे डॉक्टरांनी परवानगी दिली तर आपण लवकर  भारतात परतू असं ते म्हणाले.