‘युनिसेफ'नं प्रियांकाला सद्भावना दूत पदावरून हटवावं अशी मागणी पाकिस्तानच्या मानवी हक्कमंत्री शिरिन मझारी यांनी केली आहे. सद्भावना दूत हे अत्यंत सन्मानाचं पद आहे, याकरता कोणाची नियुक्ती करावी याबाबत युनिसेफनं दक्ष असलं पाहिजे असंही मझारी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्रियांकाचा मोदी सरकार आणि भारतीय सैन्याला पाठिंबा आहे असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
घटस्फोटासाठीच अभिनेत्रीनं केली घरगुती हिंसाचाराची तक्रार, सासूचा आरोप
काही दिवसांपूर्वी लॉस एंजलिसमध्ये ब्युटीकॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणी म्हणून प्रियांकानं उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमादरम्यान प्रियांकानं भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ ट्विट केलं असा आरोप एका पाकिस्तानी तरुणीनं केला. यावेळी संबधीत तरुणीनं प्रियांका ही संयुक्त राष्ट्रांची सद्भावना दूत आहे असं असताना पाकिस्तानविरोधात आण्विक युद्धाला तिनं प्रोत्साहन दिलं असा आरोप तरुणीनं केला.
@UNICEF needs to remove Priyanka Chopra as its ambassador immediately in the wake of her support for Indian mly and Rogue Modi govt. Otherwise it makes a mockery of such appointments. UNICEF should really be more careful on whom it appoints to these honorary positions.
— Shireen Mazari (@ShireenMazari1) August 12, 2019
प्रियांकानं तरुणीला तितक्याच संयमानं आणि तोडीचं उत्तर दिलं होतं. 'मला स्वतःला युद्ध व्हावं असं वाटत नाही. मात्र मी एक देशभक्त सुद्धा आहे. माझ्या त्या ट्विटमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते, माझ्या मते सर्वांसाठी एक मध्यम मार्ग असतो त्या मार्गावरून अनेकजण चालत असतात. ओरडून या प्रश्नावर मार्ग निघणार नाही, आपण इथे प्रेम भावनेनं एकत्र आलो आहोत', असं ती म्हणाली होती.
अभिनेत्यानं सेटवरील ४०० सदस्यांना भेट दिल्या सोन्याच्या अंगठ्या
या प्रकरणावरच पाकिस्तानी मानवी हक्कमंत्री मझारी यांनी ट्विट करत युनिसेफकडे प्रियांकाला सद्भावना दूत पदावरून हटवावं अशी मागणी केली आहे.