पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हनी सिंगचं 'ठुमका' ठरलं २४ तासांत जगभरात सर्वाधिक पाहिलं गेलेलं गाणं

ठुमका

'पागलपंती' चित्रपटातलं यो यो हनी सिंगचं "ठुमका" हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. प्रदर्शित होताच या गाण्यानं नवा विक्रम रचला आहे. "ठुमका" हे प्रदर्शित झाल्यापासून २४ तासांत जगभरात सर्वाधिक पाहिलेलं गेलेलं गाणं ठरलं आहे. हे गाणं २४ तासांत ८९ लाख पेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. 

पानिपत : संजय अहमद शाह अब्दाली तर क्रिती पार्वतीबाईंच्या भूमिकेत

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटासाठी हिट गाणी देणाऱ्या हनी सिंगच्या या गाण्याला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अंग्रेजी बीट, खडके गलासी, लुंगी डान्स, धीरे धीरे सारखी हनी सिंगची अनेक गाणी तरुणाईमध्ये हिट झाली. 

तरुणाईची आवड जाणून असलेल्या हनीच्या "ठुमका" गाण्यालाही तरुणाईचा तितकाच प्रतिसाद मिळाला.  २४ तासांत जगभरात सर्वाधिक पाहिलं गेलेलं गाणं म्हणून या गाण्यानं नवा विक्रम रचला. हनी सिंगनं यासाठी चाहत्याचे आभार मानले आहेत. 

ईदला अक्षय- सलमानची टक्कर अटळच