पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर

सुरेश वाडकर

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुरेश वाडकर यांनी खूप आनंद व्यक्त केला आहे. भारत सरकारकडून ऐवढा मोठा सन्मान मिळणे हे माझे मोठे भाग्य असल्याची प्रतिक्रिया सुरेश वाडकर यांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील मानाचे नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. 

सत्य बाहेर येण्याचा भितीने NIAकडे तपास - शरद पवार

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सुरेश वाडकर यांनी सांगितले की, गृहमंत्रालयाकडून फोनवरुन मला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती देण्यात आली. ज्येष्ठ गायिका लतादीदी आणि आशादीदींच्या आशीर्वादामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लता मंगेशकर राष्ट्रपतींना पत्र पाठवत होत्या की सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार द्या. त्यांना खूप खंत आणि काळजी होती. मला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचे एकून त्यांना देखील आनंद होईल, असे वाडकरांनी सांगितले. 

राष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात दोषी मुकेश सिंह सुप्रीम कोर्टात

दरम्यान, संगीतकारांमुळेच मी इथवर येऊ शकलो. माझ्या सगळ्या संगितकारांना, ज्यांनी मला गाणी दिली त्या सगळ्याचे हे यश आहे, असे वाडकर यांनी सांगितले. तसंच, मला माझ्या आई, दादा, मोठा भाऊ, मोठी बहीण, गुरुजींची आठवण येते. या सर्वांच्या आशिर्वाद आणि मेहनतीमुळेच मला आज पद्मश्री पुरस्कार मिळाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसंच, रविंद्र जैनसाहेबांची सध्या खूप आठवण येते. त्यांनी माझा हात धरला नसता तर मी या इंडस्ट्रिमध्ये आलो नसतो, असे त्यांनी सांगितले. 

फोन टॅप होताहेत हे माहिती होते पण..., शरद पवार यांची प्रतिक्रिया

२००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरेश वाडकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. २०११ मध्ये सुरेश वाडकरांना ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तर, मध्य प्रदेश सरकारने त्यांना प्रतिष्ठित ‘लता मंगेशकर पुरस्कारा’ने गौरव केला होता. 

पुजाच्या वाढदिवशी चाहत्यांना 'बोनस', चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित