पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्कर पाहणाऱ्यांच्या संख्येत घट

ऑस्कर २०२०

यंदाचा ऑस्कर सोहळा सर्वार्थानं अनपेक्षित ठरला. पहिल्यांदाच एका  बिगर इंग्रजी भाषिक चित्रपटानं  ऑस्करवर नाव कोरलं. दक्षिण कोरियाच्या  'पॅरासाइट' या चित्रपटाचा ऑस्करवर बोलबाला  पहायला मिळला. या चित्रपटानं ६ पैकी ४ महत्त्वाच्या पुरस्कारावर नाव कोरून इतिहास रचला. 

एकाच भूमिकेसाठी दुसऱ्यांदा 'जोकर'ला ऑस्कर

यंदाचा सोहळा हा सुत्रसंचालकाविनाही पार पडला. तब्बल साडेतीन तास चाललेला हा सोहळा पाहणाऱ्यांची संख्या मात्र या वर्षांत कामालीची घटली. भारतीय वेळेप्रमाणे सोमावरी सकाळी साडेपाच वाजता हा सोहळा अमेरिकेत पार पडला. ९२ वर्षांत पहिल्यांदाच हा सोहळा पाहणाऱ्यांच्या संख्येत घट झाली. या वर्षी २ कोटी ३६ लाखांहून अधिक लोकांनी हा शो लाइव्ह पाहिला. मात्र २०१९ या वर्षांत हा सोहळा पाहणाऱ्यांची संख्या २ कोटी ९६ लाखांहून अधिक होती. 

अग्गबाई! 'सुनबाई' तेजश्री प्रधान चक्क बॉलिवूडमध्ये

जगातील  सर्वांत मानाचा समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार सोहळा आहे.  सहा वर्षांपूर्वी हा सोहळा लाइव्ह पहाणाऱ्यांची संख्या ४ कोटींहून अधिक होती. ऑस्करच्या कार्यक्रमाची वेळ ही साडेतीन तासांपर्यंत लांबली असल्यानं या पुरस्कार लाइव्ह पाहणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचंही म्हटलं जात आहे. 
ऑस्कर विजेत्यांची यादी 

सर्वोत्तम चित्रपट- पॅरासाइट
सर्वोत्तम अभिनेता-  जोकीन फिनिक्स (जोकर)
सर्वोत्तम अभिनेत्री- रेनी  झिलवेगर (जुडी)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता- ब्रॅ़ड पीट (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - लुरा डेर्न (मॅरेज स्टोरी)
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म- पॅरासाइट 
सर्वोत्तम दिग्दर्शक- बाँग जून हो - पॅरासाइट
सर्वोत्तम मूळ पटकथा- पॅरासाइट 
सर्वोत्तम पटकथा (adapted) - जोजो रॅबिट
सर्वोत्तम माहितीपट - अमेरिकन फॅक्टरी  
सर्वोत्तम अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म - टॉय स्टोरी ४ 
 सर्वोत्तम  वेशभूषा - लिटिल वुमन
 सर्वोत्तम  साऊंड एडिटिंग - फोर्ड वर्सेस फरारी
 सर्वोत्तम  साऊंड मिक्सिंग - १९१७
प्रोडक्शन डिझाइन- वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड
सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी- १९१७ 

ब्रॅड पिटनं अभिनयासाठी पहिल्यांदाच जिंकला ऑस्कर