अमेरिकनच नाही तर जगभरातील तरुणी, स्त्रियांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या ५६ वर्षांच्या ब्रॅड पिटनं त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला पहिला ऑस्कर पटकावला. ९२ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ब्रॅड पिटनं सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. 'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड' चित्रपटासाठी ब्रॅडला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
भीतीनं 'दरबार'च्या दिग्दर्शकांनी मागितली पोलिस सुरक्षा
#Oscars Moment: Brad Pitt wins Best Supporting Actor for @OnceInHollywood pic.twitter.com/TSGjMB3v8P
— The Academy (@TheAcademy) February 10, 2020
यापूर्वी २०१२ मध्ये ब्रॅडनं ऑस्कर पटकावला होता. मात्र त्याला तो अभिनयासाठी नाही तर सर्वोत्तम निर्मात्यासाठी देण्यात आला होता. '१२ इअर्स ए स्लेव्ह' साठी सर्वोत्तम निर्मात्याचा ऑस्कर त्याला देण्यात आला होता. हा पुरस्कार जिंकल्यानंतर ब्रॅडनं चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
Oscars 2020 live: ब्रॅड- लुरा ठरले सर्वोत्तम सहाय्यक कलाकार
यापूर्वी ब्रॅड पिटनं सहाय्यक अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब, स्क्रीन अॅक्टर गिल्ड अवॉर्ड जिंकला होता. विशेष म्हणजे लिओनार्दो दी कॅप्रीओ आणि ब्रॅट पिटच्या 'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड'ला ऑस्करसाठी एकूण १० नामांकनं मिळाली आहेत.