पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली 50th IFFI च्या ज्युरी अध्यक्षपदी

 अलिकडेच मराठी राज्य चित्रपट महोत्सवासाठी जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी करोल यांनी विशेष पाहुणे म्हणू

ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांची भारतातील पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ज्युरी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळी गोवा येथे यासंबंधीची घोषणा केली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील हजर होते. 

पणजी येथे २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत रंगणाऱ्या या महोत्सवाच्या ज्युरी समितीमध्ये मधुर भंडारकर, शाजी एन. अरुण, राहुल रवैल, मंजू बोराह, कॅमेरामन अपूर्बा किशोर बीर आणि रवि कोटारकारा यांचा समावेश आहे. देशविदेशातील उत्तम चित्रपट कलाकृतीचा यात समावेश असतो.

'सुपर ३०' लवकर प्रदर्शित व्हावा, आनंद कुमार यांची होती इच्छा

अलिकडेच मराठी राज्य चित्रपट महोत्सवासाठी जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी करोल यांनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष भारतात येण्याची ही पहिली वेळ होती. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी येत आहेत. या संदर्भात ऑस्कर अकादमीचे सदस्य व चित्रपट अभ्यासक उज्जल निरगुडकर यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यास यश आले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Oscar Academy President John Bailey is the Jury President of 50th International Film Festival of India