सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात मान्यवरांमध्ये जागृती करण्यासाठी आणि या कायद्यासंदर्भात पसरविण्यात आलेली चुकीची माहिती पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये रविवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि भाजपचे उपाध्यक्ष विजयंत पांडा यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील खूप कमी कलाकार उपस्थित राहिले. दुसरीकडे या कार्यक्रमाला गेलेल्या कलाकारांवर आमचे लक्ष आहे, असे या कायद्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांनी म्हटले आहे.
खातेवाटपानंतर मंत्र्यांच्या नाराजीत वाढ, मिळालेल्या खात्यावरून असमाधान
या कार्यक्रमाला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी, निर्माते राहुल रावेल, कुणाल कोहली, संगीतकार अन्नू मलिक, दिग्दर्शक अभिषेक कपूर, अभिनेता रणवीर शोरे, शैलेश लोढा, गायक कैलाश खेर, रूपकुमार राठोड आणि शान हे प्रमुख उपस्थित होते.
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रविवारी संध्याकाळी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच होता. या कार्यक्रमाला माध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यात आला नव्हता. हिंदी, मराठी चित्रपट क्षेत्रातील केवळ २० कलाकारच या कार्यक्रमाला उपस्थित होते. सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात वस्तुस्थिती आणि अपप्रचार असा कार्यक्रमाचा विषय होता. पियूष गोयल स्वतः निमंत्रितांना संबोधित करणार होते.
मुंबई भाजपचे उपाध्यक्ष हितेश जैन म्हणाले, या कायद्यासंदर्भात जागृती करण्यासाठी आम्ही समाजातील विविध गटांशी चर्चा करीत आहोत. कायद्यासंदर्भात असलेल्या शंकांना आम्ही उत्तरे देत आहोत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला नाही. केवळ निमंत्रितांसाठी बंद खोलीमध्ये ही चर्चा होते आहे.
जेएनयू हिंसाचारः मुंबईत मध्यरात्रीपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन
गुजराती टीव्ही कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक जमनादास मजेठिया, दिलीप जोशी आणि शैलेश लोढा हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.