पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत दोन नव्या कोऱ्या वेबसीरिज

वन्स अ ईअर

 स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला एमएक्स प्लेयर मराठी प्रेक्षकांसाठी दोन नव्या कोऱ्या वेबसीरिज घेऊ आला आहे. 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' अशी या वेबसीरीजची नावं असून २० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेयरवर विनामूल्य  प्रेक्षकांना या वेबसीरिज  पाहता येणार आहेत.

अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित 'पांडू' ही वेबसिरीज पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर आधारित आहे. सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के या दोन धाडसी पोलिसांची ही कथा आहे, जे आपले शहर सुरक्षित राहावे, म्हणून सदैव तत्पर असतात. या वेबसीरीजमध्ये पोलिसांच्या रोजच्या जीवनाचे चित्रण अतिशय रंजक आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

सोनाली कुलकर्णी दिसणार ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी मराठी चित्रपटात
 

"मुंबई सारख्या मोठ्या शहराचे रक्षण करणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे हे व्रत आचरणात आणावे लागते. मुंबईसारख्या शहराचे रक्षण करण्यासाठी धाडसी आणि निडर मन असावे लागते. आपल्या मुंबई पोलिसांमध्ये हे सर्व गुण आहेत. म्हणूनच आपण आपल्या घरात, शहरात सुरक्षित आहोत, याची जाणीव करून देण्यासाठी ही सर्व मंडळी रात्रंदिवस झटत असतात.  ही कथा माझ्या खूप जवळची असण्याचे आणखी एक कारण म्हणजे यात स्त्री आणि पुरुष पोलीस खाकी वर्दी असताना आणि नसताना त्यांचे जीवन कसे असते, याचे दर्शन घडते.’’ असं  सारंग साठे  म्हणाला.

मेट्रो बांधकाम परिसरात अभिनेत्रीच्या गाडीवर दगड कोसळला
 

कपिल शर्मा शोमध्ये परतणार? सुनील म्हणतो...

 तर 'वन्स अ  ईअर' या वेबसीरीजमध्ये प्रेमाला मिळालेले एक अद्भुत वळण पाहायला मिळणार आहे. मंदार कुरुंदकर दिग्दर्शित या वेबसीरीजमध्ये निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका असून सहा भागांच्या या वेबसीरीजमध्ये या दोघांच्या प्रेमाचा सहा वर्षांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. कॉलेजमध्ये होणाऱ्या मैत्रीपासून ते प्रेमाची जाणीव होईपर्यंतचे सर्व अनमोल आणि अविस्मरणीय क्षण यात बघता येतील. "कोणत्याच प्रेमकथेची सुरुवात ही पहिल्याच नजरेत होत नाही. कोणीही पहिल्याच भेटीत आपल्या शाश्वत प्रेमाची कबुली देत नाही. यासाठी काही काळ जावा लागतो. या वेबसीरीजमध्ये एका जोडप्याच्या जीवनात त्यांचे प्रेम प्रत्येक टप्यावर कसे फुलत जाते आणि अधिक मजबूत होते, हे पाहायला मिळेल.’’ असं वेबसीरीजचे दिग्दर्शक मंदार कुरुंदकर म्हणाले.