पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युवांसाठी २६ जुलैला चित्रपटगृहात 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'चा मोफत शो

उरी : द सर्जिकल स्ट्राइक

विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट 'कारगिल विजय दिना'निमित्तानं पुनर्प्रदर्शित करण्यात येणार आहे. २६ जुलैला हा चित्रपट पुनर्प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा सकाळी १० वाजताचा शो युवकांसाठी मोफत असणार आहे. महाराष्ट्रातील चित्रपटगृहात १८ ते २५ वयोगटातील मुलांसाठी हा शो मोफत दाखवण्यात येणार आहे. ग्राहक संरक्षण, माजी सैनिक कल्याणमंत्री यांनी यासंदर्भात पत्र लिहिले होते. 

पंचतारांकित हॉटेलमधल्या दोन केळ्यांची किंमत पाहून अभिनेताही चक्रावला

राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृद्धींगत व्हावा याकरीता २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात या चित्रपटाचं मोफत आयोजन करण्यात येणार असल्याचं निलंगेकर यांनी म्हटलं आहे.  १८ ते २५ वयोगटातील युवांसाठी हा चित्रपट मोफत असेन. 

मला दिवसाला खर्चासाठी २० रुपये मिळायचे- विकी

हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता.  उरीमधील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्याचा  भारतानं सर्जिकल स्ट्राइक करत सूड घेतला. भारतीय जवानांच्या धाडसाची आणि शौर्याची कथा या चित्रपटात दाखवली आहे. २०१९ मधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट दुसऱ्या स्थानी आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:on Kargil Vijay Diwas free show of Uri The Surgical Strike for 18 to 25 years old audience