पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाढदिवशी रणवीरची चाहत्यांना खास भेट

रणवीर सिंह

रणवीर सिंह हा  सध्या त्याच्या  ‘83' चित्रपटात व्यग्र आहे. इंग्लडमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघातले अनेक  माजी खेळाडू ‘83' साठी बॉलिवूड स्टार्सनां प्रशिक्षण देत आहेत. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह हा प्रमुख भूमिकेत असून तो भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपील देव यांची भूमिका साकारत आहे. रणवीरचा आज (६ जुलै)ला  वाढदिवस आहे. वाढदिवशी रणवीरनं ‘83' चित्रपटातील त्याच्या पहिल्या लूकचा फोटो शेअर करत चाहत्यांना खास भेट दिली आहे. 

रणवीरचा ३४ वा वाढदिवस आहे. 'माझ्या आयुष्यातील खास दिवशी मी 'हरियाणाच्या हुर्रीकेनचा' फोटो शेअर करू इच्छितो' असं लिहित रणवीरनं हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत रणवीर हुबेहुब कपील देव यांच्यासारखाच दिसत आहे अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. 

विशेष म्हणजे बॉलिवूड स्टार्सनांही रणवीरचा हा लूक खूपच आवडला आहे. कपिल देव यांची भूमिका साकारणं फारच आव्हानात्मक असल्याचं रणवीर म्हणाला. यासाठी रणवीरनं कपिल देव यांच्या देहबोलीचा अभ्यास केला. कपिल देव यांच्यासोबत रणवीर दहा दिवस त्यांच्या घरी राहिला देखील. 

भारतानं १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली पहिला वर्ल्ड कप जिंकला. या विजयाची कथा  ‘83' चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:On 34th birthday actor Ranveer Singh shared his first look as Kapil Dev from the upcoming film 83