पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानची पार्श्वभूमी वाईट, गोव्यात बंदी घालण्याची काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची मागणी

सलमान खान

अभिनेता सलमान खान आणि वाद हे काही नवं नाही. गोवा विमानतळावर सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाहत्याचा फोन हिसकावून घेणाऱ्या सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सलमानचं असभ्य वागणं चाहत्यांना रुचलं नाही. म्हणूनच काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) या विद्यार्थी संघटनेनं सलमानवर गोव्यात बंदी घलावी अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. 

चित्रीकरणासाठी Man Vs Wild च्या टीमनं भरले इतके शुल्क

जर सलमाननं  त्याच्या गैरवर्तणुकीसाठी माफी मागितली नाही तर सलमानवर गोव्यात येण्यापासून बंदी घालवी अशी मागणी NSUIनं गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गोव्यातील भाजपचे सचीव आणि माजी खासदार नरेंद्र सवाईकर यांनी देखील सलमानवर टीका केली आहे. सलमाननं बिनशर्त माफी मागावी असं त्यांनी म्हटलं आहे. 

Man Vs Wild : रजनीकांतसोबत इतिहास रचण्यास तयार

सलमाननं सार्वजनिक ठिकाणी चाहत्याचा अपमान केला आहे. सलमानचा एकूण इतिहास पाहिला तर तोही वाईटच आहे त्यामुळे भविष्यात त्याच्यावर गोव्यात येण्यापासून बंदी घातली पाहिजे, असं NSUI चे अध्यक्ष अहराझ मुल्ला यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 
चित्रीकरणासाठी सलमान मंगळवारी सकाळी गोव्यात आला. सलमानला पाहताच चाहत्यांचा गराडा त्याच्याभोवती पडला. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वैतागलेल्या सलमाननं एका चाहत्याचा फोन खेचून घेतला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NSUI demands ban salman khan in Goa after viral selfie video calls him violent actor with a bad track record