पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बिग बॉस मराठीमुळे पुन्हा प्रसिद्धीझोतात आलो'

आरोह वेलणकर

 बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये आरोह वेलणकरनं खेळाच्या मध्यातून घरात एण्ट्री घेतली. पहिल्यापासून खेळाचा भाग नसलेल्या आरोहाला इतक्या कमी कालावधीतही प्रेक्षकांनी स्वीकारलं, घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांनीही प्रेम दिलं, बिग बॉसमुळे मी पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आलो असं म्हणत आरोहनं बिग बॉसचे आभार मानले. 

'बाहुबली'तल्या 'भल्लालदेव'ला पाहून चाहतेही पडले काळजीत

आरोह 'रेगे' चित्रपटात झळकला होता. 'रेगे चित्रपट खूपच हिट ठरला. या चित्रपटामुळे मला लोकप्रियता मिळाली. पण पदार्पणाच्या चित्रपटानंतर खऱ्या अर्थानं माझा स्ट्रगल सुरू झाला. रेगेनंतर मला दोन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र ते दोन्ही चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेच नाही. पण आता बिग बॉसमुळे मी पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आलो' अशा शब्दात आरोहनं  आपल्या भावना व्यक्त केल्यात. 

'मॅलेफिसन्ट २' हॉलिवूडपटाला ऐश्वर्या देणार आवाज

रेगेनंतर आरोहनं 'घंटा' या मराठी चित्रपटात, गुलमोहर मालिकेत आणि नाटकातही काम केलं आहे. तुम्ही सगळ्याच ठिकाणी दिसू लागलात की तुमचं महत्त्व कमी होतं, असं आरोह मानतो. बिग बॉसनंतर पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आलेला आरोह नव्या संधीच्या प्रतीक्षेत आहे.