पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रानू मंडलला सलमाननं ५५ लाखांचा फ्लॅट दिल्याच्या निव्वळ अफवा

रानू मंडल

आपल्या सुरेल आवाजामुळे रातोरात स्टार झालेल्या  रानू मंडलला सलमाननं ५५ लाखांचा फ्लॅट भेट दिला अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचं त्यांच्या मॅनेजरनं स्पष्ट केलं आहे. 

रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना हिमेशनं दिलं इतकं मानधन

सलमाननं रानू यांना घर भेट दिलेलं नाही, या केवळ अफवा आहेत असं रानू मंडल यांचं काम पाहणारे अतिंद्र चक्रवर्ती यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे सलमाननं दबंग ३ मध्ये गाणं गाण्याची संधीही रानू यांना दिल्याचं म्हटलं जात होतं मात्र या चर्चादेखील चक्रवर्ती यांनी फेटाळल्या आहेत.  रानू यांना ज्या चॅनेलनं मंचकावर येऊन गाणं गाण्याची संधी दिली त्या चॅलननं स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीनं त्यांचं आधार कार्ड तयार करुन घेतलं असं ते म्हणाले. 

दबंग ३ : सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार महेश मांजरेकरांची मुलगी

रानू यांच्या सुरेल आवाजानं अनेकजण प्रभावित झाले आहे. त्यांना बॉलिवूडमधल्या अनेक गायकांनी संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खुद्द ए आर रेहमान, सोनू निगम यांसारख्या गायकांनी रानू यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही ते म्हणाले रानू यांचं बहूतांश आयुष्य हे रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलं. पश्चिम बंगालच्या  रानाघाट स्टेशनवर गाणं गाऊन त्या आपलं पोट भरायच्या.