पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सारा नाही तर या अभिनेत्रीला सुशांत करतोय डेट

सुशांत सिंग राजपूत

अभिनेता सुशांत सिंग राजपुत याचं नाव गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री सारा अली खानशी जोडलं जातं होतं. काही दिवसांपूर्वी यादोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनाही उधाण आलं. सुशांतनं साराला अनफॉलो केलं इतकंच नाही तर इन्स्टाग्राम  अकाऊंटवरूनही  त्यानं पोस्ट डीलीट केल्या होत्या. सारा आधी क्रिती सॅनॉन, अंकिता लोखंडे यांना डेट करणारा सुशांत आता नव्या अभिनेत्रीला डेट करत आहे.

'देसी मार्टिनी'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार सुशांत हा सध्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत आहे.  'सुशांत रियाला डेट करत आहे.  ते दोघांना ओळखतात. त्यांच्या प्रेमाची गाडी चटकन पुढे गेली.' अशी माहिती  सुशांतच्या निकतवर्तीयांनी  दिली. 'सारा आणि सुशांत हे दोघंही केदारनाथ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. मात्र त्याला कोणत्याही नात्याचं नाव देता येणार नाही. हे नातं टीकलंच नाही. ते दोघंही विभक्त झाले' असंही सुशांतचा निकटवर्तीय  म्हणाला. मात्र रिया ही माझी केवळ चांगली मैत्रीण असल्याचं सुशांतनं स्पष्ट केलं आहे.

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांतनं अभिनयाला सुरूवात केली. अल्पावधितच तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा ठरला. त्यानंतर याच मालिकेतील सुशांतची सहकलाकार अंकिता लोखंडेला तो डेट करू लागला. सुशांत आणि अंकिता हे जोडपं त्यावेळी छोट्या पडद्यावरचं लोकप्रिय जोडपं ठरलं होतं. मात्र  हे नातं फार काळ टिकलं नाही त्यानंतर सुशांतच नाव क्रिती सॅनॉन, सारा अली खान यांच्याशी जोडलं गेलं.