पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिशाभूल करण्याचा हेतू नाही, 'त्या' ट्विटनंतर सई, सिद्धार्थचं स्पष्टीकरण

सिद्धार्थ जाधव

सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधवसह  अनेक मराठी कलाकार #पुन्हानिवडणूक या ट्विटमुळे सोशल मीडियावर टिकेचे धनी ठरले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील हा हॅशटॅग ट्विट करणाऱ्या कलाकारांवर गंभीर आरोप केले. भाजपातर्फे राजकीय ट्विट करण्यासाठी या कलाकारांना पैसे दिले जात आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. या आरोपांनंतर मराठी कलाकारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  दिशाभूल करण्याचा हेतू नाही, त्या मागची आमची भूमिका लवकरच कळेल असं स्पष्टीकरण सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर यांनी केलं आहे. 

रेल्वेत चहा-नाश्ता, जेवण महागणार, जाणून घ्या नवे दर

'आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हटलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा धुरळा  आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेत आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय. म्हणून आपल्याशी ते शेअर केलं. त्या मागची आमची भूमिका लवकरच कळेल आणि आशा आहे आपल्याला आवडेलसुद्धा. सर्वांच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही. ', असं स्पष्टीकरण  अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ जाधवनं दिलं आहे. 

प्रार्थनांना यश लतादीदींची तब्येत सुधारतेय, कुटुंबीयांची माहिती

प्रथितयश मराठी कलाकार एकाच वेळी  #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरून राजकीय ट्वीट करत आहेत, भाजपातर्फे राजकीय ट्विट करण्यासाठी या कलाकारांना पैसे दिले जात आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. भाजपची propaganda मशीनरी किती पोचलेली आहे हे यातून दिसून येते. भाजपाच्या आयटी सेलचा या कलाकारांशी काय संबंध आहे? याची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे, असंही ट्विट त्यांनी केलं होतं यावर कलाकारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

'तीन अंकी नाटकाच्या खेळात आम्हीच यशस्वी होणार'