पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून आजतागायत रविनानं पाहिला नाही 'अंदाज अपना अपना'

अंदाज अपना अपना

'अंदाज अपना अपना' पाहिला नाही असा क्वचितच 'बॉलिवूड चित्रपटप्रेमी' असेल. चित्रपट प्रदर्शित होऊन २५ वर्षे उलटली तरी या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. बॉलिवूडमधल्या  सुपरहिट कॉमेडी चित्रपटात या चित्रपटाचं स्थान टॉप १० मध्ये आहे यावरून 'अंदाज अपना अपना'च्या लोकप्रियतेची कल्पना आली असेलच. सलमान -आमिरच्या काही चाहत्यांनी तर अनेकदा हा चित्रपट पाहिल्याचीही उदाहरणं असतील.

रविनानं सांगितला 'अंदाज अपना अपना'च्या सेटवरचा न ऐकलेला किस्सा

मात्र चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रविना टंडन हिनं  आजतागायत हा चित्रपट पाहिला नाही. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रविनानं हे कबुल केलं. 'मी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा चित्रपट कधीही पाहिला नाही. अधली मधली काही दृश्य मी पाहिली आहेत. माझ्या मुलांसोबत बसून कधीतरी हा चित्रपट मी नक्की पाहिन', असं रविना म्हणाली. 

...म्हणून स्वरावर नेटकऱ्यांचा निशाणा, 'स्वरा आंटी' म्हणत उडवली खिल्ली

अंदाज अपना अपना पाहण्याचा योग कधीही जुळून आला नाही. त्याकाळी एकावेळी अनेक चित्रपटांत मी काम करत होते. इतर चित्रीकरणांमुळे मला चित्रपटाच्या स्क्रीनिंगलाही जाता आलं नाही. त्यावेळी मी ठरवलं की नंतरकधीतरी निवांतपणे मी हा चित्रपट पाहिल. मात्र तो दिवस आजतागायत उजाडला नाही', असं रविनानं कबुल केलं.