पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रविनानं सांगितला 'अंदाज अपना अपना'च्या सेटवरचा न ऐकलेला किस्सा

अंदाज अपना अपना

बॉलिवूडमधल्या सर्वात लोकप्रिय विनोदीपटांपैकी एक म्हणजे 'अंदाज अपना अपना'. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४ नोव्हेंबरला २५ वर्षे पूर्ण झाली. २५ वर्षांपूर्वी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला नसला तरी नंतरच्या काळात तो खूपच लोकप्रिय ठरला. या चित्रपटाची मोहिनी अद्यापही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. मात्र हा चित्रपट पूर्ण कसा झाला, याचंच कधीकधी आश्चर्य वाटतं असं रविना म्हणाली. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रविनानं अंदाज अपना अपनाच्या सेटवर घडलेल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. 

अंदाज अपना अपना : प्रेक्षकांचं २५ वर्षांचं 'अमर प्रेम' आणि हिट डायलॉग

'एकावेळी अनेक कलाकारांसोबत काम करण्यास मज्जा येत होती. मात्र त्यात काही समस्यादेखील होत्या. आम्ही एकमेकांशी बोलतच नव्हतो, त्यामुळे चित्रीकरण करताना खरी धम्माल येत होती. प्रत्येकाचं एकमेकांशी भांडण सुरू होतं. तेव्हा आमिर आणि सलमानही एकमेकांशी बोलत नव्हते.  सलमान आणि राजकुमार संतोषी देखील बोलत नव्हते. माझं आणि करिष्माचंही भांडण झालं होतं. अशावेळी चित्रीकरण कसं पूर्ण झालं याचंच मला राहून राहून आश्चर्य वाटतं. पण आम्ही चांगला अभिनय करू शकतो हे यामुळे समोर आलं' असं रवीना म्हणाली. 

...म्हणून स्वरावर नेटकऱ्यांचा निशाणा, 'स्वरा आंटी' म्हणत उडवली खिल्ली

'चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात मला आणि करिष्माला एका खांबाला दोरीनं  बांधून ठेवल्याचं दृष्य आहे.  मात्र चित्रीकरण संपल्यानंतरही मला आणि करिष्माला राजकुमार यांनी सोडलं नव्हतं. जोपर्यंत आमच्या दोघींमधला वाद मिटत नाही तोपर्यंत आमची सुटका करण्यास त्यांनी नकार दिला होता.', असा मजेशीर किस्सा रवीनानं सांगितला.