पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आर. के. स्टुडिओ विकला, आता गणेशोत्सव नाही'

आर. के. स्टुडिओ गणेशोत्सव

गेल्या ७० वर्षांपासून आर. के. स्टुडिओत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. राज कपूर यांनी सत्तर वर्षांपूर्वी गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. बॉलिवूडमधले  कलाकार, स्टुडिओत काम करणारी मंडळी सगळेच जण या उत्सवात आनंदानं सहभागी होतं. मात्र ही परंपरा यावर्षीपासून खंडीत होणार आहे. 'आर. के. स्टुडिओ विकला आता गणेशोत्सवासाठी जागाच नाही त्यामुळे यावर्षीपासून गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही', अशी माहिती रणधीर कपूर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. 

रानू मंडलला सलमाननं ५५ लाखांचा फ्लॅट दिल्याच्या निव्वळ अफवा

'गेल्यावर्षी आम्ही शेवटचा गणेशोत्सव साजरा केला. आता आर. के. स्टुडिओच राहिला नाही त्यामुळे गणेशोत्सव कुठे साजरा करणार? आता आमच्याकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जागाच नाही. गणेशावर आमची श्रद्धा आहे मात्र गणेशोत्सवाची परंपरा पुढे सुरू ठेवू असं मला वाटत नाही', हेदेखील त्यांनी सांगितलं. 

दबंग ३ : सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार महेश मांजरेकरांची मुलगी

मे महिन्यात हा स्टुडिओ ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने खरेदी केला. या ठिकाणी आता आलिशान अशी निवासी संकुल बांधण्यात येणार आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये आर.के. स्टुडिओ विकत घेण्याचा मानस  कंपनीनं  कपूर कुटुंबीयांकडे बोलून दाखवला होता. २.२ एकर क्षेत्रात पसरलेल्या आर. के. स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक आणि आलिशान असं निवासी संकुल बांधण्यात येणार आहेत अशी माहिती गोदरेज प्रॉपर्टीजनं दिली. गेल्यावर्षी  लागलेल्या आगीचा मोठा फटकाही स्टुडिओला बसला होता तसेच त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता.