पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अग्गबाई ! सासूबाई आसावरी खऱ्या आयुष्यात देखील आहेत सुगरण

अग्गंबाई सासूबाई

करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. त्यामुळे कलाकारांना त्यांची आवड-निवड जपण्यासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका ही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत.

PHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का?

अभिनेत्री निवेदिता सराफ या देखील त्यांच्या आवडत्या गोष्टी करताना दिसतायेत. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतून त्या आसावरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेत आसावरीला स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आसावरी एक उत्तम सुगरण आहे आणि तिच्यासारखंच निवेदिता यांना देखील स्वयंपाक करायला खूप आवडतो. 'मला जेवण करून खायला घालायला खूप आवडतं, खूप लोक माझ्या घरी माझ्या हातचं जेवून जातात त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा असं मला वाटतं,' असं निवेदिता म्हणतात.

रणवीर-दीपिकाचा '८३' OTT वर प्रदर्शित होणार?, निमार्त्यांचं स्पष्टीकरण

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Today's menu Farfalle with chicken and veggies in Arrabbiata sauce with mushroom onion and basil focaccia

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf) on

लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत निवेदिता त्यांच्या घरी रोज वेगवेगळे पदार्थ तयार करत असततात. त्यांच्या रेसिपीज चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांचं स्वत:चं युट्यूब चॅनेलही असून त्यावर त्यांचे स्वयंपाक करतानाचे अनेक व्हिडिओ आहेत. निवेदिता यांनी नुकताच 'व्हेजिटेबल स्टू' या पदार्थाची रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यांना देखील ही रेसिपी आवडली असून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता.