पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निक जोनासने शेअर केलेल्या 'या' फोटोला मिळते जास्त पसंती

गोविंदा आणि निक जोनास

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. नुकताच निकने एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या  सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. निकने इन्स्टाग्राम स्टोरीवर गोविंदा आणि त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निकची तुलना बॉलिवूड अभिनेता गोविंदासोबत करण्यात आली आहे. फोटोमध्ये निक आणि गोविंदा यांची ड्रेसिंग स्टाईल आणि लूक एकसारखाच आहे. निकने गोविंदासोबतच्या या फोटोला शेअर करत त्याला कॅप्शन “अ‍ॅक्युरेट” असे दिले आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या फॅन्सने या फोटोला खूप लाईक्स दिल्या आहेत. 

गोविंदा आणि निक

VIDEO: शाहरुख खानने फोडली दहीहंडी

दरम्यान, अभिनेत्री प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आज तिचे वडील अशोक चोप्रा यांचा आज वाढदिवस आहे. प्रियांकाने तिच्या वडिलांचा हसत असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने एक कॅप्शन दिले आहे. तिने असे म्हटले आहे की, 'दरवर्षी या दिवशी मी आणि सिध्दार्थ तुम्हाला सरप्राइज देण्यासाठी निमित्त शोधायचो. मात्र आम्ही हे करण्यात कधीच यशस्वी नाही झालो. कारण तुम्हाला आधीपासूनच सर्व माहिती असायचे. मी आशा करते की तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नेहमी आमच्या सोबत आहात. मी जे काही करते तेव्हा तुमच्या प्रोत्साहनाचा विचार करते. मी जे काही करु इच्छिते, नेहमी तुमच्या संमतीचा विचार करते. माझ्या सोबत जे काही घडते तेव्हा मी तुमचा आशिर्वाद घेताना स्वत:ला पाहते. वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा.

सनी लिओनी मुलगी निशाला देते अभ्यासाचे धडे