पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केबीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, नेटकऱ्यांचा संताप

कौन बनेगा करोडपती

सोनी वाहिनीवरचा 'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात  सापडला आहे. या कार्यक्रमात स्पर्धकाला विचारलेल्या प्रश्नात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, तर औरंगजेब बादशाहाचा उल्लेख 'मुघल सम्राट' म्हणून करण्यात आला.

नितीन गडकरी मुंबईत, राजकीय हालचालींसाठी भाजपकडे खूप कमी वेळ

 छत्रपती शिवाजी  महाराजांचा एकेरी उल्लेख  करणं हा त्यांच्या अपमान  आहे, असं म्हणत सोनी वाहिनीवर अनेकांनी नाराजी दर्शवली आहे.  महाराजांच्या अपमानाबद्दल वाहिनीनं माफी मागावी अशी मागणी  लोकांनी केली आहे. ट्विटरवर #Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.  'इनमेसे कौनसे शासक मुघल सम्राट औरंगजेब के समकालीन थे?' असा प्रश्न या आठवड्यात प्रसारित झालेल्या एका भागात स्पर्धकाला विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तराचे चार पर्याय देताना त्यात महाराजांच्या नावाचा उल्लेख ऐकरी करण्यात आला होता. 

माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

यावरूनच तीव्र नाराजी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.  'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन हे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. 

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडं