पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘सेक्रेड गेम्स २’ ऑनलाइन लीक

सेक्रेड गेम्स २

'नेटफ्लिक्स'च्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ‘सेक्रेड गेम्स २’ ला पायरसीचा फटका बसला आहे. प्रेक्षक गेल्या वर्षभरापासून या वेबसीरिजची प्रतिक्षा करत होते. अखेर नेटफ्लिक्सनं  रात्री १२ वाजताच ही वेबसीरिज प्रदर्शित केली. 

‘सेक्रेड गेम्स' चा शेवट उत्कंठता वाढवणारा होता. या सीरिजच्या दुसऱ्या भागात काय होणार याची  उत्सुकता प्रेक्षकांना होती. जवळपास वर्षभर प्रेक्षक या सीरिजच्या प्रतिक्षेत होते. मात्र प्रदर्शित  झाल्यानंतर अल्पावधितच ‘सेक्रेड गेम्स २’  ला पायरसीचा फटका बसला आहे. 

अमेय म्हणतो हा नशिबान खेळलेला 'Sacred Games'

‘सेक्रेड गेम्स २’ चे आठही भाग तामिळ रॉकर्स या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या  वेबसाइटकडून लीक करण्यात आले आहेत. या वेबसीरिजसाठी नेटफ्लिक्सनं मोठी रक्कम गुंतवली  होती. या सीरिजमध्ये बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आहेत. या सीरिजसाठी नवाजुद्दीननं सर्वाधिक मानधन मागितलं अशाही चर्चा होती. 

अशी मिळाली अमृताला 'Sacred Games 2' मध्ये भूमिका

१५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधितच या सीरिजचे सर्व भाग लीक झाले, त्यामुळे नेटफ्लिक्सला याचा फटका बसला आहे. या वेबसीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा केल्यानंतर  काही दिवसांतच नेटफ्लिक्सनं भारतीयांसाठी स्वस्त प्लानही आणला होता.