पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेटफ्लिक्स आता फक्त १९९ रुपयांत, पण...

नेटफ्लिक्स

वेगवेगळ्या गाजलेल्या वेबसीरिज आणि सिनेमे पाहण्याचे अनेकांचे हक्काचे ठिकाण नेटफ्लिक्स. आता नेटफ्लिक्सने खास भारतातील ग्राहकांसाठी स्वस्तातला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. फक्त मोबाईलच्या साह्याने नेटफ्लिक्स बघायचे असेल तर एका मोबाईलसाठी १९९ रुपये महिना असा नवा प्लॅन कंपनीकडून बुधवारी जाहीर करण्यात आला. अशा पद्धतीने फक्त मोबाईलसाठीचा आणि इतक्या स्वस्तातला प्लॅन पहिल्यांदा भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे कंपनीने स्पष्ट केले. 

PHOTOS : मुंबईला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं

नवी दिल्लीतील नेटफ्लिक्स हाऊसमध्ये एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. भारतातील ग्राहक टीव्ही किंवा इतर कोणत्याही उपकरणांपेक्षा मोबाईलवरूनच नेटफ्लिक्स वापरण्याला प्राधान्य देतात. त्याचबरोबर जगाचा विचार करता भारतात सर्वाधिक नेटफ्लिक्सचा वापर केला जातो. त्यामुळे पुढील काळात मोबाईल ग्राहकांसाठी विविध योजना आणण्याचा कंपनीचा मानस आहे, असे सांगण्यात आले.

पुण्यातील जुना बाजार बंद, महिन्याभरासाठी प्रायोगिक अंमलबजावणी

कंपनीने आणलेला नवा प्लॅन वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमध्ये नेटफ्लिक्सचे ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर केवळ एका मोबाईलसाठीचा १९९ रुपयांचा प्लॅन निवडावा लागेल. त्यांच्या त्यांच्या बँकेची माहितीही द्यावी लागेल. नव्या ग्राहकांना सुरुवातीला महिनाभरासाठी नेटफ्लिक्स मोफत बघता येणार आहे. जगात नेटफ्लिक्सचे १५.१ कोटी ग्राहक आहेत. वेगवेगळ्या १७०० डिव्हाईस मॉडेल्सवर नेटफ्लिक्स उपलब्ध आहे.