पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जोडीदाराची खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्यांना नेहाचं सडेतोड उत्तर

नेहा पेंडसे

मराठी अभिनेत्री  नेहा पेंडसे २०२० च्या सुरुवातीला व्यावसायिक शार्दुल सिंग बायाससोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच नेहानं शार्दुलसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली. 

मात्र नेहानं सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी या जोडीला ट्रोल केलं. नेहाचा होणारा पती शार्दुलला ट्रोलिंगचा सर्वाधिक सामना करावा लागला. दिसण्यावरून शार्दुलला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना नेहानं सडेतोड उत्तर दिलं आहे.

त्यांच्यामुळे मला काम मिळेना, अभिनेत्री शिल्पा शिंदेचा आरोप

यापूर्वीही वजन वाढवल्यामुळे मला आणि शार्दुलला अनेकांनी ट्रोल केलं. प्रेक्षक म्हणून कलाकारांच्या दिसण्यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार त्यांना आहे. मात्र शार्दुल हा काही मनोरंजन विश्वात काम करणारा अभिनेता नाही. तो  एक व्यावसायिक आहे. अनेकांना आरोग्याशी निगडीत काही समस्या असू शकतात, प्रेक्षकांना हे कळत कसं नाही. तूला हाच मिळाला होता का?, दुसरा कोणी शोधला का नाही? असे प्रश्न विचारण्याचा कोणालाही हक्क नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

चांगले चित्रपट नेहमी स्टारकिड्ससाठीच, अभिनेत्रीची खंत

शार्दुल एक उत्तम जोडीदार आहे. तो नेहमीच माझ्या सुखाचा विचार करतो. तो माझ्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. शार्दुल माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे असं नेहा बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.