पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नवऱ्याच्या घटस्फोटाबद्दल कशाला बोलता, मी तरी कुठे व्हर्जिन आहे'

नेहा आणि शार्दुल यांचा नुकताच विवाह झालाय

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे नुकतीच  व्यावसिक शार्दुल सिंग बियास या आपल्या प्रियकरासोबत विवाह बंधनात अडकली. शार्दुलचा दोनवेळा घटस्फोट झाला असून त्याला दोन मुली असतानाही तिने त्याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत नेहाने यासंदर्भात मोकळेपणाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

शार्दुलच्या आयुष्यात यापूर्वी काय घडले याचा मला काही फरक पडत नाही. सध्याच्या घडीला अनेकजण वेगवेगळ्या कारणास्तव उशिरा लग्न करतात. यात करिअर हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो. लग्नापूर्वी बऱ्याच जणांचे एकाहून अधिक अफेअर असतात. लग्नाच्या नात्यासारखेच त्याच्यांत संबंध असतात. फक्त त्यावर लग्नाची मोहर लागलेली नसते. शार्दुल घटस्फोटीत असला म्हणून काय झाले? मी तरी कुठे व्हर्जिन आहे, अशा शब्दांत पतीच्या घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

...म्हणून एप्रिलमध्ये हनिमूनला जाण्याचा नेहा- शार्दुलचा निर्णय

आपला पती शार्दुलचं कौतुक करताना ती पुढे म्हणाली की, तो अशा महिलांसोबत राहिला ज्या त्याच्यावर प्रेम करत होत्या. माझ्याबाबतीत अगदी शार्दुलपेक्षा विरुद्ध घडलं. लग्नाची गोष्ट आली त्यावेळी माझ्यासोबत असणाऱ्या पुरुषांनी माझी साथ सोडली. दोन घटस्फोट होऊन देखील शार्दुलला लग्न या संकल्पनेवर विश्वास असल्याची गोष्ट मला अभिमानास्पद वाटते. जे लोक लग्नाला घाबरुन यापासून दूर पळतात त्यांच्यासाठी शार्दुल एक उत्तम उदाहरण असल्याचेही नेहा यावेळी म्हणाली.   

मित्राच्या डिनर पार्टीत कतरिना आणि विकी दिसले एकत्र

आडनाव बदलण्याच्या मुद्यावरही नेहाने आपल्या भावना व्यक्त केल्या. शार्दुलची पत्नी होणे हे मी भाग्य समजते. विवाह संपन्न झाल्यानंतर लगेच मी माझ्या नावात बियास नाव जोडल्याचे तिने हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: nehha pendse on husband shardul having two daughters why are people talking about him being a divorcee i am not a virgin either