पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेहा पेंडसे जानेवारीमध्ये अडकणार विवाहबंधनात

नेहा पेंडसे

अभिनेत्री नेहा पेंडसे ही नव्या वर्षांच्या सुरुवातीला विवाह बंधनात अडकणार आहे. नेहा  ही व्यावसायिक शार्दुल बायासला डेट करत आहे. शार्दुलसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेहानं काही महिन्यांपूर्वी आपल्या नात्याला अधिकृत दुजोरा दिला.  आता ती जानेवारी महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. 

जोडीदाराची खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्यांना नेहाचं सडेतोड उत्तर

पुण्यात विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं नेहा टाइम्स ऑफ इंडियाशी साधलेल्या संवादात म्हणाली. ५ जानेवारीला विवाहसोहळा पार पडणार आहे. अत्यंत जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाला सोहळ्याचं आमंत्रण असेल असंही नेहा संबधित वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

तीन जानेवारीपासून विवाहसोहळ्याच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. ३ तारखेला मेहंदी त्यानंतर संगीत आणि ४ तारखेला साखरपुडा असेल अशी माहितीही नेहानं दिली. हा सर्व सोहळा पुण्यात होणार असल्याचंही नेहानं सांगितलं. लग्नाला महिन्याभराहूनही कमी वेळ उरला असल्यानं नेहा सध्या तयारीत व्यग्र आहे. 

जयेशभाई जोरदार : रणवीर सिंग साकारणार गुज्जू छोकरो