पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्नानंतर शार्दुलसोबत नेहानं साजरा केला पहिला गुढीपाडवा

नेहा- शार्दुल

अभिनेत्री नेहा पेंडसे हिनं पती शार्दुल बायाससोबत पहिला गुढीपाडवा साजरा केला. नेहानं शादुर्लसोबत फोटो शेअर केला आहे, तिनं तिच्या तमाम चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्वांना घरीच थांबून आपल्या परिवाराची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रातील लोकांना उत्तम आरोग्य लाभो, पंतप्रधानांच्या शुभेच्छा

नेहा आणि शार्दुल पारंपरिक पेहरावात तयार झाले आहेत.  या पेहरावात दोघंही फारच सुंदर दिसत होते. जानेवारी महिन्यात नेहा आणि  शार्दुलचा विवाहसोहळा संपन्न झाला. पुण्यात मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. नेहा सध्या पतीसोबत मुंबईत राहत आहे. 

ती लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वात नेहानं आपली ओळख निर्माण केली आहे. 
घरी बसून कपडे, टॉयलेट धुतोय शिखर धवन, शेअर केला मजेशीर Video