पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेहाकडून अग्नीशमन दलाच्या जवानाला २ लाखांची भेट

नेहा कक्कर

बॉलिवूडमधली प्रसिद्ध गायिका आणि 'इंडियन आयडॉल ११' ची परीक्षक नेहा कक्कर सध्या चर्चेत आहेत. तिनं अग्नीशमन दलाच्या जवानाला २ लाख रुपये भेट म्हणून दिले आहेत. तिचा दिलदारपणा पाहून सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून 'इंडियन आयडॉल ११' च्या मंचावर अनेक लष्करी, पोलिस  अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि अग्नीशमन दलाचे जवान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

शबाना आझमींच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच देणार डिस्चार्ज

यावेळी नेहानं गेल्या चाळीस वर्षांपासून अग्नीशमन दलात कार्यरत असलेल्या बिपिन गणत्र यांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. तिनं गणत्र यांना भेट म्हणून २ लाख रुपये देण्याचं वचन दिलं आहे. गणत्र हे पद्मश्री पुरस्कार विजेते देखील आहेत. तुम्ही स्वत:च्या जीवाचा विचार न करता अनेकांचे प्राण वाचवले आहेत. तुम्ही आम्हाला सुरक्षित ठेवता म्हणूनच मला तुम्हाला लहानशी भेट द्यायची आहे असं नेहा म्हणाली. यापूर्वीही नेहानं इंडियन आयडॉलच्या मंचावर आलेल्या एका स्पर्धकाला मदत केली होती. 

तान्हाजी करमुक्त, राज्य सरकारचा निर्णय