पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवाळी साजरी करण्यासाठी नेहानं स्पर्धकाला दिले १ लाख

नेहा कक्कर

इंडियन आयडल ११  या शोची जज् असलेल्या नेहानं एका स्पर्धकाला दिवाळी साजरी करण्यासाठी १ लाख रुपये दिले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं दिवाळी साजरी न करू शकणाऱ्या स्पर्धकाची गोष्ट ऐकून नेहाही भावूक झाली. 

'गेम ऑफ थ्रोन्स'च्या प्रीक्वलची अधिकृत घोषणा

झारखंडमधून आलेल्या या स्पर्धकाला नेहानं १ लाख रुपये दिले. दिवास असं या स्पर्धकाचं नाव आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्यानं आपल्या परिवारासोबत दिवाळी साजरी केली नव्हती. फॅक्टरीमधून काम करताना केवळ दूरुन इतरांना दिवाळी साजरी करताना पाहिली होती मात्र दिवाळी साजरी करण्याचा योग कधीच आला नाही असं तो म्हणाला.

दिवाळी पार्टीत आलेल्या कतरिना- विकीची सर्वाधिक चर्चा

पैसे नसल्यानं दिवाळी साजरी न करु शकणाऱ्या दिवासला नेहानं पैसे दिले असल्याचं पिंक व्हिलानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कुटुंबीयांसाठी  नवी कपडे, मिठाई खरेदी करण्यासाठीही नेहानं सांगितलं असल्याचं संबधित वेबसाइटनं म्हटलं आहे.