पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आई झाल्यानंतर नेहाला काम मिळेना

नेहा धुपिया

अभिनेत्री नेहा धुपिया ही सध्या एक टॉक शो होस्ट करत आहे. नेहा २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकली. नेहाला एक मुलगी देखील आहे. मात्र आई झाल्यापासून कामच मिळेनासं झालंय अशी खंत नेहानं बोलून दाखवली आहे. इतकंच नाही तर अनेकदा बॉडी शेमिंगचाही  सामना करावा लागत असल्याचं नेहानं सांगितलं

परीक्षक पद सोडलं नाही, विश्रांती घेतोय ; वादावर अनु मलिकचं स्पष्टीकरण

गर्भवती होते तेव्हा 'तुम्हारी सुलू' या चित्रपटाची ऑफर मला आली होती. या चित्रपटात मी शेवटचं काम केलं. त्यानंतर मला कोणत्याही चित्रपटाची ऑफर आलेली नाही असं, नेहा पिंक व्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

बाळाचा जन्म झाल्यानंतर वजन वाढलं होतं. वाढलेल्या वजनामुळे अनेकदा सोशल मीडियावर मला ट्रोल करण्यात आलं होतं. टिकांमुळे अनेकदा मानसिक दडपणही यायचं असंही नेहा म्हणाली होती. 

'तान्हाजी' मराठीतही होणार डब, अजयने मानले अमेय खोपकर आणि मनसेचे आभार

नेहानं किक्रेटर अंगद बेदीसोबत २०१८ साली लग्न केलं. नेहा लग्नाआधीच गर्भवती होती, नेहाच्या टॉकशोमध्ये विविध सेलिब्रिटी येतात. एका भागात अंगदही आला होता यावेळी दोघांनी कबुली दिली होती.