गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला 'बधाई हो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत नीना गुप्ता, गजराज राव प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटातील नीना गुप्ता गजराज राव या ऑनस्क्रीन जोडीचं सोशल मीडियावर खूपच कौतुक झालं होतं. ही ऑनस्क्रीन जोडी सध्या लंडनमध्ये आहे. गजराज यांच्यासोबतचा फोटो नीना गुप्ता यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जहाँ मैं जाती हूँ वहीं चले आते हो असं कॅप्शन देत नीना यांनी गजराज यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
तर गजराज यांनीदेखील नीना गुप्ता यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. परदेशात जवळच्या व्यक्तीची भेट होणं यासारखा आनंदाचा क्षण दुसरा नाही असं कॅप्शन देत गजराज यांनीही नीना गुप्ता यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे.
नीना गुप्ता आणि गजराज राव यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' मध्ये देखील दिसणार आहे.