पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या भूमिकांसाठी तरी आमचा विचार करा, नीना गुप्तांची जाहीर नाराजी

नीना गुप्ता

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 'सांड की आँख' चित्रपटाचा ट्रेलर पाहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तापसी पन्नू, भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या  'सांड की आँख' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात दोघीही आपल्या वयानं दुप्पट असलेल्या भूमिका साकारत आहेत. तरुण मुलींनी ज्येष्ठ व्यक्तींच्या भूमिका साकरण्यापेक्षा त्या जागी बॉलिवूडमधल्या ज्येष्ठ अभिनेत्रींचा विचार अशा भूमिकांसाठी करायला हवा', असं मत नीना यांनी व्यक्त केलं आहे. 

जूही चावला पुन्हा होणार खलनायिका

'सांड की आँख' हा चित्रपट वयाची साठी ओलांडलेल्या शार्पशूटर  चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्यावर आधारलेला आहे. तापसी आणि भूमी या दोघींनी चंद्रो आणि प्रकाशी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर अनेक ट्विटर युजर्सनं या भूमिकांसाठी नीना कुलकर्णी, शबाना आझमी आणि जया बच्चन यांचं नाव सुचवलं होतं. बॉलिवूडमधल्या या ज्येष्ठ अभिनेत्री या भूमिकेत शोभून दिसल्या असत्या असंही अनेक ट्विटर युजर्सचं मत पडलं. यावर नीना गुप्ता यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. 'आमच्या वयाच्या भूमिका तरी किमान आमच्याकडून करून घ्या', अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. 

सोनाक्षी म्हणजे 'धन पशू', मंत्र्याची टीका

नीना गुप्ता यांनी बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी मला काम मिळत नाही त्यामुळे काम असल्यास कळावे अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहिली होती. माझ्याकडे सध्या काम नाही त्यामुळे जाहीरपणे काम मागण्यास मला लाज वाटत नाही असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.