पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमोल कोल्हे निर्मित मालिकांचे एका दिवसाचे मानधन पूरग्रस्तांना देणार

अमोल कोल्हे

पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर आला. या पूरामुळे तिन्ही जिल्ह्यातले जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक राजकीय पक्षांसह अनेक सामाजिक संस्था धावू आल्या आहेत. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील कोल्हापूर, सांगलीकरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हा यांची निर्मिती संस्था जगदंब क्रिएशनने एक उपक्रम हाती घेतला आहे. या संस्थे अंतर्गत सुरु असलेल्या दोन मालिकांच्या संपूर्ण टीमने त्यांचे एका दिवसाचे मानधन पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. कलम ३७०: आतिफ असलमची सोशल मीडियावर भारतीयांनी घेतली शाळा

यासंदर्भात अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. 'स्वराज्य रक्षक संभाजी' आणि 'स्वराज्यजननी जिजामाता' या दोन मालिकांची निर्मिती अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशनने केली आहे. या दोन्ही मालिकांच्या कलाकारांनी त्याचसोबत मालिकेच्या इतर टीमने पूरग्रस्तांना आपले एका दिवसाचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघातील सर्व जनतेला एक भाकरी आणि शेंगदाणा चटणी, शक्य झाल्यास बिस्किटाचे पुडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करा असे आवाहन केले आहे. ही मदत तातडीने पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे शुक्रवारी त्यांनी सांगितले होते. तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री सई ताम्हणकर ही देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. VIDEO: 25 वर्षानंतर माधुरी-सलमानचा ‘पहला-पहला प्यार है’ गाण्यावर डान्स