पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवाजुद्दीन म्हणतो हॉलिवूडमध्ये काम करायचं आहे पण...

नवाजुद्दीन

 नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या चर्चेत असेला बॉलिवूड स्टार आहे. नुकतीच नवाजची 'सेक्रेड गेम्स' ही वेबसीरिज सोशल मीडियावर प्रदर्शित झाली. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

चांगले चित्रपट नेहमी स्टारकिड्ससाठीच, अभिनेत्रीची खंत

बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलेल्या नवाजलाही हॉलिवूडमध्ये काम करायचं आहे. मात्र त्यासाठी नवाजची एक अट आहे. 'अनेक भारतीय कलाकारांना हॉलिवूडमध्ये काम करायचं आहे. मला त्यापैकी एक व्हायचं नाही. मलाही हॉलिवूडमध्ये काम  करण्याची इच्छा आहे. मात्र मला चांगलं काम करायचं आहे.  जर मला भारतात चांगल्या कामाच्या संधी मिळत असतील तर मी हॉलिवूडचा विचार का करु?', असं रोखठोक मत नवाजचं आहे. 

त्यांच्यामुळे मला काम मिळेना, अभिनेत्री शिल्पा शिंदेचा आरोप

'जर हॉलिवूडमध्ये काम करायचं असेन तर मला आधी एजंटचा शोध घ्यावा  लागेन. त्याच्याकडे सतत काम मिळतंय का याचा पाठपुरावा करावा लागेन. हे सगळं करण्यापेक्षा मला वाटतं जर हॉलिवूडमधल्या  एखाद्या दिग्दर्शकाला माझ्यासोबत खरंच काम करायचं असेन तर त्यानं माझ्याजवळ यावं', असं नवाज म्हणाला आहे.