पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवाज- मौनीच्या ‘बोले चुडिया’ची पहिली झलक

बोले चुडिया

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय हिनं  अक्षय कुमारचा चित्रपट 'गोल्ड'मधून बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत प्रवेश केला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्यासोबत ती ‘बोले चुडिया’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवाजचा भाऊ शमास सिद्दीकी करणार आहे.  ‘बोले चुडिया’च्या दिग्दर्शनातून पहिल्यांदाच नवाजचा भाऊदेखील चित्रपटसृष्टीत येणार आहे.

 कायम गंभीर किंवा  खलनायकी भूमिकांना प्राधान्य देणारा नवाजुद्दीन या चित्रपटामध्ये मात्र  एका रोमॅण्टीक अंदाजात पाहायला मिळणार आहे.  ‘बोले चुडिया’चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच नवाज आणि मौनी ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@imouniroy in #bolechudiyan

A post shared by Shamas nawab Siddiqui (@shamasnawabsiddiqui) on

जून महिन्यात ‘बोले चुडिया’च्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. मार्च महिन्यात नवाजनं मौनीच्या नावाची घोषणा केली होती. मी  मौनीसोबत  काम करण्यास खूपच उत्सुक आहे. आमची जोडी नव्या प्रेमकथेत शोभून दिसेन अशी पोस्ट  नवाजनं लिहिली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@nawazuddin._siddiqui in #bolechudiyan

A post shared by Shamas nawab Siddiqui (@shamasnawabsiddiqui) on

नवाज हा एक उत्तम अभिनेता आहे त्याच्यासोबत काम करताना मला  खूप काही शिकायला मिळणार हे नक्की  या चित्रपटासाठी मी खूपच उत्सुक आहे असं मौनी म्हणाली .