पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : अनुपम खेर यांचा नसीरुद्दीन शहा यांच्यावर पलटवार

अनुपम खेर आणि नसीरुद्दीन शहा

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर पलटवार केला आहे. नसीरुद्दीन शहा यांचे आयुष्य हे नैराश्य आणि वैफल्यग्रस्तेत गेलं आहे. त्यामुळे त्यांचे कोणतेही वक्तव्य मी गंभीरपणे घेत नाही, अशा शब्दांत त्यांनी नसीरुद्दीन शहा यांना प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या रक्तात फक्त अन् फक्त हिंदुस्थान आहे, असा टोला अनुपम खेर यांनी लगावला आहे. 

मायावतींनी HM अमित शहांचे चॅलेंज स्वीकारलं

नसीरुद्दीन शाह यांनी सीएए-एनआरसी-एनपीआरच्या मुद्यावरुन अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला होता. अनुपम खेर यांचा उल्लेख जोकर असा करत त्यांच्या बोलण्याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज नाही. ते मनोरुग्ण आहेत आणि त्यांच्या रक्तात हेच आहे, अशा शब्दांत नसरुद्दीन शहा यांनी अनुपम खेर यांच्यावर टीका केली होती. नसीरुद्दीन शहा यांनी केलेल्या टीकेवर अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर पलटवार केलाय.  शहा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. नसीरुद्दीन शहा यांनी माझ्यासंदर्भात दिलेली मुलाखत पाहिली. त्यांनी माझं कौतुक करताना मला जोकर, मनोरुग्ण अशी उपमा दिली. मला गंभीरपणे न घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. त्याबद्दल त्यांचं मी आभारच मानतो, असं खेर यांनी व्हिडिओत म्हटले आहे. 

हिंदूंना शिव्या आणि मुस्लिमांबद्दल प्रेम हेच तर काँग्रेस करत आलाय'

 नसीरुद्दीन शहा वयाने आणि अनुभवानेही मोठे आहेत. मी नेहमीच त्यांच्या अभिनयाची आणि कलेचा आदर बाळगतो. मी त्यांचं म्हणणं कधीच गंभीरपणे घेत नाही. तसेच यापूर्वी मी त्यांच्याबद्दल वाईट मत व्यक्त केलेलं नाही. पण आता मला बोलायचं आहे. असं सांगत त्यांनी नसरुद्दीन शहा यांना चांगलेच सुनावले आहे. प्रचंड यश मिळवल्यानंतरही तुम्ही संपूर्ण आयुष्य नैराश्यात घालवलं. त्यातूनच या टीका होत असाव्यात, असा टोलाही खेर यांनी लगावला आहे. माझ्यावर टीका करून एक-दोन दिवस तुम्ही चर्चेत येत असाल तर ठिक आहे. तुम्ही माझ्या रक्तात काय आहे हे सांगण्याची गरज नाही. माझ्या रक्तात  फक्त हिंदुस्थान आहे, असंही खेर यांनी म्हटले आहे.


 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Naseeruddin Shah Calls Anupam Kher Joker Anupam Kher Answer Through Video On Twitter watch video