पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाना पाटेकर लवकरच दिसणार चित्रपटात

नाना पाटेकर

गेल्यावर्षी आलेल्या मी टुच्या वादळात नाना पाटेकर यांचं नाव अग्रस्थानी होते. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपांनंतर नाना पाटेकर यांची तातडीनं  'हाऊसफुल ४' चित्रपटातून गच्छंती करण्यात आली. 

मराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज

त्यानंतर जवळपास वर्षभराच्या अवधीनंतर नाना पाटेकर हे चित्रपटात दिसणार आहेत. नाना पाटेकर यांनी शेवटचं रजनीकांत यांच्या 'काला' चित्रपटात काम केलं होतं. आता ते एका तमिळ स्पाय थ्रीलर चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी नाना पाटेकर यांनी चित्रपटाला होकार दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

कतरिनाच्या जागी स्वत:ची निवड केल्याबद्दल श्रद्धा म्हणते... 

जयम रामीसोबत ते या चित्रपटात दिसणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा चित्रपट अक्षय कुमारच्या 'बेबी'चा तामिळ रिमेक असण्याची शक्यता आहे. जवळपास ६० कोटींचं बजेट चित्रपटांचं असणार आहे.