पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागराज- रितेश साकारणार ‘शिवत्रयी’

नागराज- रितेश साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची ‘महागाथा’

दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘महागाथा’ प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. शिवजयंतीचं औचित्य साधत या ‘महागाथा’ची घोषणा करण्यात आली आहे. 

The Neighbors Window :शेजाऱ्यांच्या घरात डोकावून पाहताना बदलेलं आयुष्य

'एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की  रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी', असं लिहित नागराज मंजुळेंनी ही खुशखबर चाहत्यांना दिली आहे.

गेल्या वर्षभरापासून अभिनेता रितेश देशमुख  छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार अशा चर्चा होत्या. आता याची औपचारिक घोषणा देखील करण्यात आली आहे. या शिवत्रयी अंतर्गत 'शिवाजी', 'राजा शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी' अशा तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं समजत आहे. 

छत्रपतीनां मानाचा मुजरा करून सरसेनापती हंबीरराव तुमच्या समोर हजर

या चित्रपटासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असू द्या असंही रितेशनं म्हटलं आहे. 

बिग बी म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज शब्द नाही तर मंत्र आहेत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nagraj manjule ritesh deshmukh unveiled upcoming movie on chatrapati shivaji maharaj trilogy