पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार नागार्जुनही

ब्रह्मास्त्र

आलिया- रणबीर कपूर, अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला 'ब्रह्मास्त्र' गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. हा चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटापैकी एक आहे.  या चित्रपटात नागार्जुनही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नागार्जुन पुरात्त्व शास्त्रज्ञाच्या भूमिकेत या चित्रपटात पाहायला  मिळणार असल्याची माहिती मुंबई मिररनं दिली आहे. 

अभिनेता अर्जुन रामपाल - मेहर जेसिया यांचा घटस्फोट

गंगेच्या काठी वसलेल्या पुरातन मंदिराचा शोध घेणाऱ्या पुरात्त्व शास्त्रज्ञाच्या  भूमिकेत नागार्जुन दिसणार आहेत. जूनमध्ये वाराणसीला या चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. 'ब्रह्मास्त्र' च्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनी अमिताभ आणि नागार्जुन एकत्र काम करत आहेत. 'अग्नी वर्षा' आणि 'खुदा गवाह' या चित्रपटात  अमिताभ बच्चन आणि नागार्जुननं एकत्र काम केलं होतं. 

अजयनं सांगितला 'तान्हाजी'मध्ये काजोलसोबत काम करण्याचा अनुभव

या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.  हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र अनेक कारणांमुळे  चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं. आता हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.