पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या भीतीनं २० दिवसांचं चित्रीकरण केलं रद्द

वाईल्ड डॉग

दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या आगामी चित्रपटाचं २० दिवसांचं चित्रीकरण  कोरोनाच्या भीतीमुळे रद्द करण्यात आलं आहे. नागार्जुनच्या 'वाईल्ड डॉग'चं चित्रीकरण थायलंडमध्ये होणार होतं. यासाठी २० दिवस चित्रपटाची टीम थायलंडमध्ये जाणार होती. या आठवड्यात हे चित्रीकरण सुरु होणार होतं मात्र कोरोनाच्या भीतीनं थायलंडमधलं चित्रीकरण रद्द करण्यात आलं आहे. 

ऋषी कपूर पुन्हा मुंबईतील रुग्णालयात दाखल

आतापर्यंत कोरोना बाधित २५ प्रकरणं थायलंडमध्ये समोर आली आहे. झपाट्यानं परसरत चाललेल्या या विषाणूमुळे चीनमध्ये जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाला आहे तर २४ हजारांहून  अधिक लोकांमध्ये या  आजाराची लक्षणं आढळली आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेतली  जात आहे. 

अक्षयची ब्रँड व्हॅल्यू वधारली, दीपिका- आमिरलाही टाकलं मागे

त्यामुळे 'वाईल्ड डॉग'च्या संपूर्ण टीमनं खबरदारी म्हणून इथे चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यापासून चित्रीकरण सुरु होणार होतं. चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण दृश्य इथे चित्रीत होणार होती.  मात्र आता टीमनं तिथे काही दिवस चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.